Alumni Success Stories

संकेत खंदारे , व्हाईस प्रेसिडंट - इमर्जिंग टेक अँड प्रॉडक्ट हेड, विनजीत टेकनॉलॉजी प्राव्हेट लिमिटेड , नाशिक
संकेत खंदारे यांनी २००६ मध्ये के. के. वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथून बी. ई. (आयटी इंजिनिअरींग) ची पदवी संपादन केली.पदवी संपादन केल्याबरोबरच त्यांनी विनजीत टेकनॉलॉजी लिमिटेड या अँड्रॉइड अँप व मशीन लर्निंग च्या क्षेत्रात अतिशय नावाजलेल्या कंपनीत काम सुरु केले. सुरुवातीला सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि त्यानंतर लीड टेक्निकल आर्किटेक्ट म्हणून आपल्या कामाचा ठसा निर्माण केल्यानंतर अतिशय कमी कालावधीत आर अँड डी विभागाचे प्रमुख करण्यात आले.
काम करत असतानाच त्यांनी कॉनव्होल्यूशनल न्यूरल नेटवर्क , डीप लर्निंग , मशीन लर्निंग या तांत्रिक विषयांमध्ये नैपुण्य व ज्ञान मिळवत त्याचा कंपनीच्या यशासाठी वापर केला. त्यांच्या या तांत्रिक क्षेत्रातील कामामुळे त्यांना नॅस्कॉम या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या संस्थेकडून गौरवण्यात देखील आले.
त्यांच्या तांत्रिक विषयाबरॊबरच व्यवस्थापनाच्या कौशल्यामुळे त्यांना कंपनीत व्हाईस प्रेसिडंट या महत्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली.उपजतच असलेल्या नवीन काही तरी शिकण्याच्या वृत्तीला अनुसरून त्यांनी अगोदर आय. सी. एफ.ए.आय. या संस्थेतून एमबीए व नंतर भारतात अतिशय नावाजलेल्या अशा आय. आय.एम. बेंगलोर या संस्थेतून जनरल मॅनॅजमेण्ट ची पदवी संपादन केली.दरम्यान त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून शैक्षणिक क्षेत्रात देखील ते विद्यार्थ्यांना विविध तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतात.

ऋषिकेश जाधव , हेड-प्रॉडक्ट अँड रिसर्च, इएसडीएस प्राव्हेट लिमिटेड , नाशिक
ऋषिकेश जाधव यांनी २००८ मध्ये के. के. वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथून बी. ई. (आयटी इंजिनिअरींग) ची पदवी संपादन केली.
पदवी संपादन करत असतानाच अतिशय हुशार असलेल्या ऋषिकेश यांनी पदवीच्या अंतिम वर्षात विशेष श्रेणीत उत्तीर्ण होत प्रथम क्रमांक मिळवला.यानंतर त्यांनी पर्सिस्टन्ट या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कंपनीत काम करून आपला वेगळा ठसा उमटवला.
नेहमीच संशोधनाची आवड असलेल्या ऋषिकेश यांना मात्र वेगळीच संधी खुणावत होती. आपल्या संशोधक वृत्तीला अनुसरून त्यांनी इएसडीएस प्राव्हेट लिमिटेड, नाशिक या क्लाऊड कॉम्पुटिंग मध्ये नावाजलेल्या कंपनीत रिसर्च इंजिनिअर या पदावर काम सुरु केले. स्वतःच्या संशोधक वृत्ती व अथक परिश्रमाच्या जोरावर थोड्याच कालावधीत त्यांना सिनियर रिसर्च इंजिनिअर करण्यात आले.सध्या ते या कंपनीत रिसर्च विभाग प्रमुख या पदावर काम करत आहे.आपल्या कारकिर्दीत त्यांनी क्लाऊड कॉम्पुटिंग मध्ये अतिशय महत्वाचे संशोधन करून टाइम डिटेक्शन ऑफ रिसोर्स रिक्वायमेण्ट अँड ऑटोमॅटिक अडजस्टमेंट्स या संदर्भातले पेटंट मिळवले.याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नल मध्ये त्यांचे शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाले आहे.
यादरम्यान त्यांनी पुणे विद्यापीठातून एम. ई. कॉम्पुटर ची देखील पदवी संपादन केली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून शैक्षणिक क्षेत्रात ते विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पात देखील मार्गदर्शन करतात.यशाच्या शिखरावर जाऊन देखील त्यानी महाविद्यालयाशी आपले ऋणानुंबंध जपले याचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे.

के. के. वाघ कॉलेज ने इंजिनीरिंगचाच नव्हे तर नैतिक आणि सामाजिक जाणिवेचा पाया रुजविला : दिप्ती कुलकर्णी
दिप्ती कुलकर्णी के. के. वाघ कॉलेजच्या २००२ च्या कॉम्प्युटर इंजिनीरिंगच्या बॅचमधे प्रथम क्रमांकावर झळकल्या होत्या. त्या सध्या अमेरिकेत न्यू जर्सी येथे स्थायिक आहेत. तिथे बँक ऑफ अमेरिकेत Vice President पदवीवर development टीम च्या मॅनेजर आहेत. बँकेत Asian Leadership Network NJ chapter कम्युनिकेशन्सच्या अध्यक्ष पदावर आहेत. संगणक, कला आणि महिलांच्या विषयी क्षेत्रात अमेरिकेतील कॉलेजमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्स आणि रिसर्च मधे गाईड करतात.
त्या आपल्या चित्रकलेतून आणि लिखाण कामातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी आपले अनेक "Solo" चित्रकला प्रदर्शन भारतात आणि अमेरिकेत भरविले आहेत. त्यांची बरीच चित्रं विविध मसिकांच्या मुखपृष्ठांवर झळकली आहेत. मुखपृष्ठांसाठी कॉम्प्युटर ग्राफिक डिझाईन करायची आवड आहे. दीप्ती कुलकर्णी यांचा विश्वास आहे की जागृती करणे ही उपाय शोधण्याचि पहिली महत्वाची पायरी आहे. आणि त्यांना खात्री आहे की त्यांची चित्रकला महिलांना नक्कीच प्रेरणा देईल. कलेतून सामजिक प्रबोधनासाठी आणि ह्या चित्रांसाठी दीप्ती कुलकर्णी यांना नाशिकमधे आणि अमेरिकेत अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या चित्रकला प्रदर्शनाला मुख्यमंत्री दिवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई ,भारतीय राजदूत, अमेरिकेतील राजकीय लोक आणि मराठी कलाकारांनी भेट दिली होती. जुलै 2015 मधे दीप्ती कुलकर्णी यांचे "वूमन एम्पॉवरमेंट" चे चार दिवसांचे सोलो चित्रकला प्रदर्शन बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनामधे कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलीस शहरात भरविण्यात आले. दीप्ती कुलकर्णी यानी मुख्य मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना व अन्य मान्यवरांना आपल्या "वूमन एम्पॉवरमेंट" च्या चित्रांची माहिती दिली व कलेमधून जन जागृती बद्दल आपले विचार संगितले.
सर्व मान्यवरांनी व लोकानी दीप्ती कुलकर्णी यांच्या कलेचे व ह्या विषयाबद्दल जागृती करण्याच्या कार्याला उत्तम प्रतिसाद दिला.
"मी स्वत:ला जागतिक नागरिक मानते. स्त्रियांवरील अत्याचार या जागतिक समस्या आहेत. म्हणूनच हे चित्रं किंवा कविता एका विशिष्ठ जाती, धर्म, देश आणि कम्युनिटी साठी नसून humanity साठी आहे.", असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यांचे म्हणणे आहे की कुठल्याही यशस्वी कार्यासाठी पाया मजबूत असणे महत्वाचे आहे. के. के. वाघ कॉलेजने इंजिनीरिंगचाच नव्हे तर नैतिक आणि सामाजिक जाणिवेचा पाया रुजविला. कॉलेजने कायमच एक पाठबळ आणि आत्मविश्वास दिला. पेपर प्रेसेंटेशन्स, technical talks आणि events organizations च्या पण अनेक संधी दिल्या. यामुळे संगणक क्षेत्रातच नव्हे तर कला क्षेत्रात सुद्धा उपयोग झाला. Ideation आणि Innovation हे कुठल्याही क्षेत्रात creative thinking ने करता येते. तर कॉलेज त्या creativity ला सुद्धा वाव देते.

मी श्वेता पिंगळे. मी क. का वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, व्यवस्थापन शास्त्र विभागा मध्ये २००९-२०११ दरम्यान विद्यार्थी होते. सध्या मी मानव संसाधन सल्लागार व कॉर्पोरेट ट्रेनर आहे. मी मानव संसाधन क्षेत्रात माझ यश पूर्णपणे महाविद्य व महाविद्यालयातील शिक्षकवर्ग यांना समर्पित करते.
माझी वित्त शाखा निवडण्याची स्पष्ट योजना असताना, विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांनी मला त्याऐवजी मानव संसाधन निवडण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांचे असे मत होते की मानव संसाधन प्रवाहात माझे व्यक्तिमत्व आणि कौशल्य अधिक चांगले वापरले जाईल. सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी जो विश्वास स्थापन केला होता, तो पहाता, दुसरा काही विचार न करता, मी माझा विचार बदलायचा निर्णय घेतला. मी मानव संसाधन क्षेत्रात माझा करिअर शोधण्याचा निर्णय घेतला आणि आज मी 20 पेक्षा जास्त कंपन्यांशी सल्लामसलत करते. मी मोमेंटम ट्रेनिंग आणि एचआर कन्सल्टन्सीसह सोबत साडे सहा वर्षांच्या कालावधीत माझ्या करियरमध्ये विविध कंपन्यांकडून 5000 पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षण दिले आहे. क. का वाघ महाविद्यालयातील योग्य ज्ञान, अत्यंत समर्थक आणि कार्यक्षम कर्मचारी, सुविधा, ग्रंथालय इत्यादींनी मला माझ्या कारकीर्दीस आकार देण्यास मदत केली.

नमस्कार!!!
मी सागर सोनावणे. मी माझे एम बी ए इन प्रोडक्शन आणि मटेरिअल्स मॅनेजमेंट क. का वाघअभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेतील व्यवस्थापन शास्त्र विभागातून २०११साली पूर्ण केले.
मी आरंभीचे साडे चार वर्ष क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनी मध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून जळगाव येथे कार्यरत होतो. सध्या मी क्रॉम्प्टन ग्रीव्हज , गोवा येथे उत्पादन प्रमुख म्हणून कार्यरत आहे .येथे आम्ही ३ अश्वशक्ती चे ३३००० मोटर्स प्रति महिना उत्पादित करतो याचा मला अभिमान आहे.
आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येक युवकाला चपळ, कार्यक्षम व सर्वकार्यकुशल असावे लागते. त्याचबरोबर त्याचे वागणे हे नीतिमत्तेला व व्यवसायिकपणाला धरून हवे. तसेच तो एक जबाबदार नागरिक ही हवा असतो.हे सगळे गुण अंगिकारण्यासाठी तसे शिक्षणही घेणे आव्यश्यक आहे. असे शिक्षण मला क का वाघ मध्ये एम बी ए करीत असताना मिळाले. क का वाघ मधील उच्चशिक्षित शिक्षक वर्ग ,सुसज्ज ग्रंथयालये या मुळे मिळणारे यश सोपे झाले.
क का वाघ मध्ये शिक्षण घेत असताना मला नेतृत्व गुण आत्मसात करणे शक्य झाले हे सांगणे अतिशय महत्वाचे आहे आज मी याच मुळे १०० हुन अधिक लोकांचे नेतृत्व करत आहे ज्यांची उत्पादन क्षमता मी २७००० मोटर्स प्रति महिना वरून ३३००० मोटर्स प्रति महिना वर नेवू शकलो आणि त्याचमुळे मला सलग ३ वर्ष कंपनी कडून ड्रीम टीम मेंबर व क्रॉम्प्टन ग्रीव्हज सुपरस्टार हे पुरस्कार मिळाले आहेत.
माझ्या या यशामध्ये क. का वाघअभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेतील माझ्या एम बी ए विभागाचा सिंहाचा वाटा आहे.

हाशिम शेख, बहुतेक लोक त्याला बहुमुखी असल्याचे म्हणतात. 'कोडफॉर्मर्स' नावाच्या एका सॉफ्टवेअर फर्मचे व्यवसाय प्रमुख तसेच 'एपेक्स बेकर्स' नावाने बेकरी व्यवसाय आणि कॅलिफोर्निया, अमेरिका येथील स्टार्टअपमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर अशी अनेक पदे ते भूषवितात.
त्यांनी हायस्कूल शिक्षण पूर्ण केल्यापासून कॉर्पोरेट जगामध्ये पाऊल उचलले. केवळ 18 वर्षांचा असताना त्याने वैद्यकीय क्षेत्रात काम करून आपले पहिले वेतन मिळविले. त्यानंतर 2011 मध्ये. डेटा विश्लेषक म्हणून त्यांनी ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा.लि. मध्ये सामील होऊन हळूहळू माहिती तंत्रज्ञान उद्योगाकडे आपला मार्ग सेट केला. ईएसडीएस मध्ये अर्धा दशकांचा अनुभव मिळवून त्याने डिसेंबर 2016 मध्ये पुढील आव्हानांवर मात करण्याचा निर्णय घेतला. ते कॅलिफोर्निया येथे स्थित रिप रिपल नेटवर्क इंक, अमेरिका मध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून सामील झाले.
दुसरीकडे, त्याच वर्षी त्याने कन्सल्टिंग आणि सॉफ्टवेअर विकासाच्या उद्देशाने एक सखोल कंपनी सुरू केली जेणेकरुन त्याने आपल्या क्षमतेचा सर्वोत्तम उपयोग केला. 2017 मध्ये त्यांनी 'एपेक्स बेकर्स' ही दुसरी फर्म स्थापन केली जेथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर केक तयार केले. या क्षणी या दोन्ही कंपन्यांसह राज्यव्यापी आणि नंतर देशव्यापी विस्तार करण्याचा त्यांचा हेतू आहे.
हाशिम नाशिकच्या बाहेरील भागात इगतपुरी नावाच्या छोट्याशा गावातील आहे. त्यांनी 'होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल' नावाच्या शताब्दीच्या जुन्या शाळेतून आपले शिक्षण पूर्ण केले. संगणकांसाठी असलेली उत्कटतेमुळे ते नाशिक शहराकडे वळले. के के वाघ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अँड कॉम्प्यूटर सायन्स कॉलेज मध्ये बीसीए आणि के के वाघ इंस्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग, एज्युकेशन आणि रिसर्चमध्ये एमसीए या दोन पदव्या त्यांनी मिळवल्या. 2011 आणि 2015 मध्ये बीसीए आणि एमसीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये बौद्धिक संपत्ती अधिकारांमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम आणि 2018 मध्ये वाणिज्य पदवी पदवी पूर्ण केली. सध्या मनोविज्ञान विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम घेत आहेत. त्याने मोठ्या कार्यक्रमांमध्ये आणि क्रीडा स्पर्धेत भाग घेतला जेथे तो खूप चांगले करू शकला.
त्यांचे दृढ विश्वास आहे की शैक्षणिक संस्थांनी आतापर्यंतच्या मैलाचा दगड गाठण्यासाठी त्यांच्या आयुष्यात एक मोठा भाग बजावला आहे. खासकरून, के के वाघ अभियांत्रिकी, शिक्षण आणि संशोधन संस्था जेथे त्यांनी अधिक अनुशासित असल्याचे शिकले. शिक्षक आणि सल्लागारांच्या मदतीने पूर्णवेळ कार्यरत असताना आणि पूर्ण-वेळ एमसीए अभ्यासक्रम शिकत असताना, ते सर्व मुदतींचे पालन करून वेळेचे व्यवस्थापन करण्यास सक्षम होते. के के वाघ एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

Name: Rohit Bagad
Admission Year: 1999
Graduation Year: 2003
Current Organization with Designation: Founder & CEO at Inuxu Digital Media Technologies Pvt. Ltd
Experience in years: 13 Years
Rohit Bagad is Innovation hungry product evangelist who believes that the true potential of digital media can open up infinite opportunities for every entity in the digital ecosystem. Earned more than 9 years of experience while working with companies comprising 360 degrees of digital marketing and advertising ecosystem consisting of mobile/Internet advertising technologies, Ad Networks, Digital Ad Agencies, Digital Publishers, Data Analytics and IT consultancy. Also, working on different roles like Product Management and Marketing, Media Operations and Planning, Domain Expert, and Business Head has further strengthened my vision and passion towards ‘Digital’ as an advertising medium.

Name- Akash Rajaram Dahadade
Admission Year- 2012
Graduation Year- 2016
Present Designation-: Assistant Section Officer, Mantralaya, Government of Maharashtra.
Views- At the time of annual college function our Hon. Principle sir listed out the notable achievements of alumnus of the college. That year some 4-5 students from K.K.Wagh College were selected in different civil services posts. Out of curiosity, I gathered the information of various civil services exam and their requirements. Various activities of college such as Soft skill sessions, seminars on a variety of topics helped a lot in personality development. After passing out in June 2016 I started my preparation and got selected for the post of Assistant section officer in April 2018. Now I am preparing for the post of Deputy Collector through Mpsc Rajyaseva exams. With the analysis of previous questions papers, reading authentic sources and regularity and honesty in the study these exams can be clear with ease.

Name: Chetan Kalamkar
Admission Year: 2005
Graduation Year: 2009
Current Organization with Designation: Deputy Commissioner of Income Tax, Indian Revenue Service (IRS), Karnataka.
Experience in years: 3 Years in TCS + 4 Years in IRS
Views regarding Department and College:
I passed out of KKWIEER in 2009 from Electronics and Telecommunications department. Before passing out of the college, I had got placed in India's biggest software company, Tata Consultancy Services (TCS). I worked for TCS in Pune for 3 years. To prepare for the Civil Services Exam, I quit TCS in 2013. I could successfully clear prestigious UPSC Civil Services Exam, 2013. I am now part of Indian Revenue Service (IRS). Presently I am posted as Assistant Commissioner of Income Tax in Karnataka.
During engineering in KKWIEER, I could develop abilities such as analytical skills, critical examination of issues etc.These abilities helped me in my career both in TCS and now in IRS.
राहुल स. पाटील
सिनिअर एक्झ्यूकेटीव्ह – टेक्नोलॉजी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, अंबड, नाशिक
के.के.वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग, एज्युकेशन अँड रिसर्च येथून बी.ई. इलेक्ट्रिकल ची प्रथम श्रेणीत पदवी घेतल्यानंतर राहुल २००८ सालापासून इंजिनिअरींग क्षेत्रात कार्यरत असून विविध कंपन्यांमधून काम करत अनुभव घेत आहेत. आज ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रात क्रॉम्टन ग्रीव्हज् लिमिटेड सारख्या नामांकीत उद्योगसमूहात सिनिअर एक्झ्यूकेटीव्ह म्हणून कार्यरत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचे क्षेत्र विस्तारत असून यामध्ये अनेक संधी उपलब्ध आहे, याचाच प्रत्यय राहुल यांच्या मागील १० वर्षांच्या कारकिर्दीत येतो.
सुरवातीला एका छोट्या कंपनीमध्ये अभियंता म्हणून त्यांनी कंपनीच्या ग्राहकांशी संवाद साधत तेथील कामकाजात हातभार लावला. तसेच त्यांच्या वरिष्ठांसोबत अनेक उपक्रमांमध्ये जसे ले-आउट, डिझाईन, असेम्बली यांसारख्या कामांत सहभाग घेऊन अनुभव संपादन केला.
स्वतःची प्रगती साधत जेमिनी इन्स्ट्राटेक प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथे विपणन अभियंता म्हणून काम केले. निर्यातीवर भर असलेल्या या कंपनीमध्ये आंतर व बाह्य ट्रान्सफॉरमर, कंडेन्सर बुशिंग यांच्या विक्रीमध्ये सहभाग घेतला. या कार्यात त्यांनी ग्राहकांशी थेट संपर्क करून कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती देणे, ग्राहकांची असलेली गरज त्यानुसार डिझाईन विभागाकडून तसे उत्पादन बनवून घेणे या कामांचा अनुभव मिळवला.
विपणन कार्यकारी अभियंता म्हणून प्रगती साधत त्यांनी क्रॉम्टन ग्रीव्हज लिमिटेड येथे कामास सुरूवात केल्याने त्यांना बढती मिळाली. विविध उत्पादनांच्या जसे की, जी आय एस सरकिट ब्रेकर, जी आय एस डिसकनेक्टर अँड अर्थिंग स्विच या उत्पादनांमध्ये डिझाईनिंगच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. यासाठी विविध कार्यक्षमता आत्मसात करून त्यांनी नैपुण्य मिळवले आहे. क्रॉम्टन ग्रीव्हज लिमिटेडच्या अनेक उत्पादनांच्या डिझायनिंगमध्ये ते सक्रीय असून त्यांनी आत्मसात केलेले कौशल्य ते वापरू शकतात. के.के. वाघ कॉलेजच्या इलेक्ट्रिकल विभागापासून सुरु झालेला हा प्रवास उंच शिखरांकडे झेपावतो आहे.

संस्थापक, हायड्रॉन इंजिनिअरींग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड
के. के. वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेतून २००७ साली केमिकल इंजिनिअरींगची (रासायनिक अभियांत्रिकी) पदवी घेतल्यानंतर अर्जुन यांनी टेक्सास ए. अँड एम्. युनिव्हर्सिटी, यू.एस.ए. येथून एम. एस. हे पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. सिम्युलेशन अँड थर्मोडायनॅमिक्स यामध्ये त्यांना विशेष आवड निर्माण होऊन त्यांनी ईपकॉन इंटरनॅशनल इंक येथे इंजिनिअरींग मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. या कंपनीच्या कार्यकाळात त्यांनी युटीलिटी सिस्टिम्समधील पी एन ए ओ याविषयी अमेरिकेतील अनेक रीफायनरिज्, पेट्रो केमिकल अँड केमिकल कंपन्यांमध्ये काम केले. इंजिनिअर एड सिनेट , इंजिनिअरींग या विषयात काम केले. या काळात अर्जुन यांनी एप्कॉन इंटरनॅशनलसाठी बँगलोर येथे ऑफिस उघडून तेथील मनुष्यबळास प्रशिक्षण देऊन त्याचे कामकाज बघितले. अशा रितीने त्यांनी या कंपनीचे काम भारतामध्ये मिळवून दिले.
आत्तापर्यंत पी एन ए ओ अंतर्गत १०० हून अधिक कार्याचा भाग त्यांनी पेलला आहे. यामध्ये विशेष प्रणालींमधील संकुचित वायू, पाणी थंड करणे, वाफ, इंधन यासारख्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले.
त्यांच्या कार्याचा गौरव करत एप्कॉन इंटरनॅशनल तर्फे त्यांना ‘टॉड विलमन अवॉर्ड ऑफ दि इयर ’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अनेक प्रकल्पांमधून विविध प्रणालींचा वापर करून त्याद्वारे करोडो रुपयांची बचत करून त्यांनी प्रणालींची परिणामकारकता वाढवली.
अर्थातच के. के. वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेतून घेतलेल्या शिक्षणाचा भक्कम पाया या आधारावर अर्जुन गुज्जर यांनी हायड्रॉन इंजिनिअरींग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही स्वतःची कंपनी स्थापन केली.

सि इ ओ - सि टी ओ , कर्ली बिनरीज लॅब ,एल एल पी
उदय वासवानी यांनी बी सी ए ची पदवी घेतल्यांनंतर के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथे एम सी ए ही पदव्युत्तर पदवी घेऊन त्यांनी आपल्या अभियांत्रिकीच्या कारकीर्दीस सुरवात केली.
एम सी ए शिकता शिकता स्वतः मध्ये असलेली जिज्ञासू वृत्ती व नेतृत्व गुण तसेच "कमवा आणि शिका" या संकल्पनेवर विश्वास ठेवून उदय Microsoft कंपनीचा Microsoft स्टुडन्ट पार्टनर बनला. त्या अंतर्गत त्याने विविध कार्यशाळा आयोजित केल्या. एम सी ए च्या तिसऱ्या वर्षी कॅम्पस इंटरव्हिव दरम्यान उदय ची नाशिक मधील UMS Tech Labs या नामांकित कंपनीत इंटरशीप साठी निवड झाली. तेथे त्याने डॉट नेट व गुगल टेकनॉलॉजि मध्ये विविध प्रोजेक्ट्स विकसित केले.
Microsoft स्टुडन्ट पार्टनर आणि UMS Tech Labs मधील इंटरशीप या दोन्ही अनुभवाच्या आणि आत्मविश्वासा च्या जोरावर त्याने २०१६ साली कर्ली बिनरीज लॅब कंपनी ची स्थापना केली.
कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मधील विविध प्रणालींमध्ये ते सध्या कंपनीच्या कामकाजाचे नियोजन करतात तसेच कंपनीच्या भावी वाटचालीसाठी सदैव उत्साही व प्रयत्नशील असतात.
सि टी ओ म्हणून काम करतांना कंपनीच्या उद्दिष्टांना वित्तीय, बौद्धिक किंवा राजकीय भांडवलाचे व्यावहारिक नियोजन व वापर करण्याची जबाबदारी ते व्यवस्थितपणे सांभाळतात. उदय वासवानी हे कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेशी संलग्नित असून तेथेही कार्यशील आहेत.
के. के. वाघ येथे एम सी ए ही पदवी मिळवून त्यांनी अभियंता हा दर्जा प्राप्त केला व संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात ते आपल्या कार्याचा ठसा उमटवीत आहे.

Story:
Vanky Kenny Kataria, who did his mechanical engineering was a complete nerd until he lost his father in the second year of engineering life. He was then inspired to do more with life than just studies. So, He started with public speaking where he soon represented India at the international level,but, to no avail. He was called as one of the worst presenters by one of the judges and was laughed at . He then kept working for one straight year to prepare for the competition, and this time around, He was able to bag the 2nd spot in South Asia for his presentation and speaking skills. Today, Vanky has keynoted at conferences such as the Coca Cola's Youth Speak Forum,2017 and has been featured in international books like '30&Under' and magazines such as Forbes, Huffington Post, Entrepreneur,etc.
Journey from K.K Wagh to Current Position:
Journey from K.K.Wagh to my current scenario has been a wonder ride. I've always been a big advocate of my college's contribution to my life. My mentor Mr. Jaydeep Shah, My college's staff and team have been instrumental in my journey. From a boy with over 99% attendance in every subject, a nerd who didn't do anything but studies , a student who had nothing but studies in his mind to a boy who went onto participating in competitions at various places across India and today, has been ranked as one of the top 100 professionals around the world under the age of 30 in books such as '30&Under' authored by Peter Cuderman and has been ranked as one of the top 13 emerging communication skills coaches by 'PeopleMaven'. Such a transformation wouldn't have been anywhere near possible hadn't it been for K.K.Wagh.
Notable Achievements:
1. Ranked as one of the top emerging communication skills coaches around the world by 'PeopleMaven'.
2. Ranked as one of the top professionals around the world under the age of 30 in the book '30&Under' authored by Peter Cuderman.
3. Featured in international magazines such as Forbes, Entrepreneur, Huffington Post, MSN, Reader's Digest, CEO Blog Nation and various others.
4. Speaker at TEDx BalajiITS, Warangal in Telangana on the 25th Jan, 2019.
5. Brand ambassador of India for 'Host Your Voice' and keynote speaker at the Coca Cola's Youth Speak Forum, 2017.
Contribution of K.K.Wagh in my Career:
K.K.Wagh contributed immensely to my life. Whether it was getting the basics of engineering right in the first year of my engineering life through our teachers or it was supporting my extra- curricular activities which needed the staff's permission and guidance, K.K.Wagh always stood by me and always helped me when it was needed. I never went to a single tuition or class in my entire engineering life but still had an aggregate of around 80% throughout my four year tenure, All Thanks to my amazing teachers! I could never forget your teachings. My mentor Jaydeep Shah Sir guided me and mentored me for public speaking and other competitions, My HOD Milind Murugkar Sir and the entire department were always behind me when it was needed. They were truly awesome! Principal Keshav Nandurkar Sir and the entire college team whether it was the admin or other support staff, Everyone was like one BIG family. A family like no other. A family which always tool care of it's members no matter what.
Memorable events in K.K.Wagh :
K.K.Wagh gave me some of the most memorable moments of my life. Whether it was the annual function or the department level competitions, My college's event always had the spark and the opportunity to present our skills in front of others. I distinctly remember teachers taking classes even though there might be only a couple of students present in the class. The importance of studies for the college is unparalleled. I could also never forget the amount of immense support my teachers, HOD and Principal gave me when it was needed. The days were simply as they call it 'Golden'. I could never forget how great an influence K.K.Wagh had on me.
I would like to thank you from the bottom of my heart for this honour, It feels an absolute pleasure. K.K.Wagh is truly one of the best colleges out there and it's support and encouragement has been really amazing.
Website: www.vankykataria.com

Alumni present designation and affiliations
- Co founder & Chief Executive at Changemakers Today
- Employee at TCS Pune since Mar 2014
Success story
I was born & brought up in small & beautiful city, Nashik which is around 220 km from Pune. I have pursued my BE mechanical engg. from K.K Wagh College, Nashik in 2013 & secured 1st class with distinction. I have handled multiple roles like MESA President & Treasurer, TPO Co-ordinator & Mecheaven Event Head during my final year of engg. Basically, I'm HR professional & social entrepreneur by line of work. I've worked with TCS from Mar 2014 as Design engineer, Quality Control Analyst & Production Support engineer in manufacturing & medical vertical. I have also worked as CSR representative and led Kelkar Museum & Pavana River project on behalf of TCS. In July 2017, I was awarded as Best Performer in my TCS project for excellent client service & also training my team effectively. Due to poor financial condition of my family, I'm currently bearing the entire expense of my MBA at Sinhgad Institute of Management on my own. I'll be joining back TCS in Jun 2019 as an HR Recruiter.
I'm also the Co-founder of Changemakers Today which is digital hub of social service organizations & social activists. It is completely self-sustainable, digital & zero-cost initiative. It is based on concept of connecting the dots for maximizing the social impact in society. So far around 200+ NGO's, trusts, companies, social enterprises, colleges, etc. are connected to it. Fortunately, on the first anniversary of Changemakers I was appointed as Global Youth Ambassador at A World at School on 16 th Aug ‘17. Each & every organization associated with Changemakers is working persistently on some specific cause for the betterment of society. It is a forum where one could host the social events/ activities in collaboration with other teams & also share about their wonderful work/ initiatives across others to get quick visibility. This is the web of like-minded people/ social activists for clean, green & better Pune. Recently I had launched Transform Pune initiative to bridge the gap between NGO's & citizens and it is a platform where the citizens from all walks of life will get to know about all the social initiatives in Pune. I request all the youth to come ahead for the social welfare & betterment of our society since individually we are one drop but together, we are an ocean. As per Mahatma Gandhi, the best way to find you is to lose yourself in the service of others is one of the principles, I follow in my life. Last but not the least, some of my strengths & skill sets includes managing corporate projects effectively, accepting responsibilities, ability to handle multiple tasks, lateral thinking to create best possible feasible solution, positive ‘can do’ attitude towards work, achieving targets under high pressure environments, implementing best practices, planning & executing events, advantageous work productivity, self-confidence, passion, enthusiasm, proactiveness, good communication skills, quick learner, etc. I’m also true believer of Karma which says, you get what you give, whether it’s good or bad. For me life begins at the end of my comfort zone & believing in myself is the first secret to all my achievements.
Journey from K K Wagh to Current Organization
It has been truly amazing journey from my college days to where I'm standing currently. It started when I was placed in TCS during my final year. Earlier I was skeptical about joining IT industry being a mechanical engineer but then I got wonderful opportunity to work across various mechanical & design related projects. I got many learning opportunities in TCS which set my career on right path. When I came to Pune in 2014, I parallelly started volunteering for different social activities. Then later in 2016, I established Changemakers Today platform to address different social issues in our society through mutual collaboration.
Notable achievements
- Global Youth Influencer from India at Their World
- Global Youth Ambassador at Their World
- International Youth Ambassador at International Youth Society
- Global Goodwill Ambassador from India
- World leader for humanity
- Awarded best performer in one of the TCS projects in 2017
Contribution of K K Wagh in molding his/her career
College & faculty members had played a great role in molding my career & setting it on right path during initial stages. I have got many learning & development opportunities through college towards my career aspirations. Being MESA President & TPO coordinator during my final year, I further got better exposure & opportunity to unleash my potential. I would like to express my sincerest gratitude towards college for being the building stone of my career & help me achieve my goals.
Memorable events in K K Wagh and Subsequent learning.
I had great time while co-ordinating for Mecheaven fest for consecutive 3 years. It is one of the most memorable event of my life.
Co-Founder, Changemakers Today
Founder, Connecting Pune Recruiters
Global Youth Ambassador, Their World
Pashan Sus Road, Pune - 411021
Mob: 9420963360
Facebook: https://www.facebook.com/versatilerohan
https://www.facebook.com/changemakerstoday/
LinkedIn: https://www.linkedin.com/in/rohan-shinde

असोसिएट व्हॉईस प्रेसिडंट, हायब्रीड इलेक्ट्रिक टेकनॉलॉजि, के पी आय टी टेकनॉलॉजि
१९९५ मध्ये के. के. वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथून बी. ई. इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिग्री घेऊन तेजस यांनी अतिशय वेगळी रिवोलो हायब्रीड टेकनॉलॉजि विकसित केली आणि त्यामध्ये संशोधन करून सध्याच्या जागतिक परिस्थितीला अनुसरून वाहनांच्या तंत्रज्ञानातील काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबर मायलेज स्टँडर्डचा विचार त्यांनी नव्याने मांडला आहे.
अर्थातच हायब्रीड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानामध्ये २० हून अधिक पेटंट मिळवले आहेत. या तंत्रज्ञानामुळे इंधनावर चालणारे वाहन हे विद्युत उर्जा स्त्रोतावरही चालवता येऊ शकते. यामध्ये कुठल्याही वाहनाला प्लग इन हायब्रीड इलेक्ट्रिक वेहिकल (पी एच ई वी) मध्ये स्थित्यंतरित करून पर्यावरणपूरक वाहन म्हणून वापरता येऊ शकते. यामध्ये २ उद्दिष्ट्ये साध्य होतात. ती म्हणजे वाहनाची वाढीव क्षमता वापरात येऊ शकते आणि ती देखील वाजवी दरामध्ये. याशिवाय एक पर्यावरणपूरक पर्याय वाहनधारकाला मिळतो.
या हायब्रीड तंत्रज्ञानामध्ये मोटार आणि इंजिन हे एकाच वेळेस काम करू शकते. इतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी संपल्यानंतर वाहन बंद पडण्याची शक्यता असते. परंतु या तंत्रज्ञानानुसार बॅटरी संपल्यानंतरही ते वाहन प्रचलित असलेल्या इंधन पद्धतीवर काम करू शकते. याचे वैशिष्ट्य असे की, हे वाहन घरच्या घरी विद्युत पुरवठ्यावर चार्ज करता येते.
या पद्धतीच्या वाहनांसाठी तेजस यांनी विविध विषयांतील कौशल्य संपादित केले असून यामध्ये वाहन व त्यातील तंत्रज्ञानातील विविध बाबींचा समावेश आहे. या कामासाठी तेजस यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून, यामध्ये
- ‘ वॉल स्ट्रीट जर्नल टेकनॉलॉजि इंनोव्हेशन अवॉर्ड २०११’
- बेस्ट इम्पलेमेंटेड सस्टॅनबिलिटी इनोवेशनं साठी ‘नॉलेज व्हार्टन इंनोव्हेशन टूर्नामेंट अवॉर्ड २०११’
- ई टी झिग व्हीलस ' ऑटोमोटिव्ह आयडिया ऑफ दि इयर अवॉर्ड २०११'
- प्रॉमिसिंग इंनोव्हेशन साठी 'नॅस्कॉम इंनोव्हेशन अवॉर्ड २०११ '
- इंडियन सेमीकोण असोसिएशनस ‘ टेक्नोवेशन अवॉर्ड २०११’ या पुरस्कारांचा समावेश आहे.
एकूणच तंत्रज्ञानातील वेगळी वाट विकसित करून तेजस यांनी देशाच्याच नव्हे, तर जगाच्या प्रगतीला हातभार लावला.
के. के. वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना त्यांच्या मनात रिसर्च डेव्हलपमेंट विषयी रुजलेले बीज अशा पद्धतीने वाढत असताना बघून त्यांच्या शिक्षकांना अभिमान वाटत आहे.

संशोधक, के.टी.एच रॉयल इन्स्टिट्यूटऑफटेक्नॉलॉजी, स्टॉकहोम, स्वीडन
मॅनेजर, फंक्शनल सेफ्टी अँड आर्कीटेक्चर, ऑटोनॉमसड्रायव्हिंग, पालो अल्टोयू.एस.ए.
२००३ साली के.के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्चयेथून मेकॅनिकल इंजिनीअरींगची पदवी घेतल्यानंतर, के.टी.एच स्वीडन येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले व पी.एच.डी ही पदवी घेतली.
२००३ पासून विविध कंपन्यांमध्ये काम करत ऑटोमोटीव्हसिस्टीम,एंबेडेडहार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग, फंक्शनलसेफ्टी, सायबरसिक्युरिटीया तांत्रिक विषयांमध्ये नैपुण्य व ज्ञान मिळवत आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले. यामध्ये के.टी.एच रिसर्च (आरसीवी) कन्सेप्ट व्हेईकल अपग्रेडेड व्हर्जन,इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आर्किटेक्चर फॉर के.टी.एच (आरसीवी),पार्शलीऑटोनॉमसड्रायव्हिंगसिस्टीम, मोबाईलरोबोटिक्सप्लॅटफॉर्म असे अनेक विषय त्यांनी विकसित केले. त्यांच्या कामांमध्ये त्यांनी २ पेटंट मिळवले असून यू.एस.व युरोप मधील अनेक कॉन्फरन्स व शैक्षणिक संस्थांमधून त्यांनी व्याख्याने दिली आहेत.
दरम्यान त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून शैक्षणिक क्षेत्रात ते विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पात मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर अनेक जर्नल्स मधून त्यांचे शोधनिबंध तसेच तंत्रलेखन प्रसिध्द झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये देखील लेखन केलेले आहे.
त्यांच्या विद्वत्त व व्यावसायिक कारकीर्दीमध्ये यशस्वी वाटचाल होतांना के.के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथे अभियांत्रिकी शिक्षणाने पाया रुजवला व प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाकडे बघण्याची दृष्टी दिली असे ते आवर्जून सांगतात.